Thursday, 30 April 2020

CORONA

पशू - पक्षी
मुक्त श्वास घेती
तुझ्यामुळे

वृक्ष - वल्ली
बहरतील आता
तुझ्यामुळे

मनु - दनु
एक होतील
तुझ्यामुळे

अस्त्र - शस्त्र
गांजतील सारे
तुझ्यामुळे

सजीव - निर्जीव
भेद नुरला
तुझ्यामुळे

निर्जिव रेणूची
संहार शक्ती पाहिली
म्या तुझ्यामुळे

अधून - मधून
येत जा भेटीला
माणूसकी उरेल
तुझ्यामुळे

से.नि.प्राचार्य,
ईश्वर भाई चौधरी
#Covid19

No comments:

Post a Comment